Runanubandh 2025-26 - Get-together by GMM for Prospective Boys & Girls


आमच्या विषयी थोडसं...
.
श्री गणेश मित्र मंडळ ही एक सामाजिक संस्था आहे. आर्य वैश्य समाजाच्या २० परिवारांचे हे मंडळ आहे. ह्याचे संस्थापक श्री बाबुराव शक्करवार यांच्या संकल्पनेतून या मंडळाची स्थापना २००३ साली झाली. आपल्या समाजातील २० परिवारांचे हे एक कुटुंबच आहे. ह्या कुटुंबात एकूण २० परिवारातील पुरुष, महिला, मुले व मुली मिळून १०१ सदस्य आहेत. या परिवारापैकी कुणाच्याही सुख दु:खात हे संपूर्ण कुटुंबच हजर असत. आपल्या समाजातील महिला व मुलांना आपले कौशल्य दाखवण्यासाठी या मंडळाने पुढाकार घेऊन त्यांच्या साठी एक व्यासपीठ उभारून दिले आहे..
या व्यासपीठावर दर महिन्याला होणाऱ्या बैठकीत विविध स्पर्धा, विविध विषयावर चर्चा वेगवेगळ्या वयोमानाच्या गटाप्रमाणे होत असतात. हया मंडळा तर्फे सर्व सदस्यांसह दर दोन वर्षाला वेग वेगळ्या ठिकाणी सहलीचे आयोजन केले जाते. हा उपक्रम मागील २२ वर्षापासून सतत होत आहे. मंडळाच्या परिवारातील सर्व सदस्यांत प्रेम जिव्हाळा व आपले पण निर्माण व्हावे याच संकल्पनेने मंडळाची स्थापना करण्यात आली. हीच संकल्पना पूर्ण पणे प्रत्यक्षात उतरवून १०० टक्के सफलता मिळालेली आहे..

श्री गणेश मित्र मंडळाने यावर्षीपासून संस्थेचे एक सन्माननीय सदस्य कै. प्रदीप चाडावर यांच्या जयंती निमित्त एक नवीन उपक्रम सुरू केला असून पहिल्यांदाच समाजातील ७५ वर्षे पूर्ण केलेल्या १५० जोडप्यांचा सद्गुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यापुढे दरवर्षी त्या त्या वर्षात ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार व विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्यांचा सत्कार करण्याचा मानस आहे.

या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्ताकडे समाजोपयोगी कार्य करण्यासाठी केलेली असून, त्याचा नोंदणी क्रमांक E-000629(NND) आहे..
आपल्या समाजाच्या सर्वच मेळाव्यात बहुसंख्य समाज बांधव उपस्थित असतात. त्या मध्ये बऱ्याच वेळेस एकदा भेट झाल्यानंतर पुन्हा भेट होणे फारच अवघड असते. उपवर-उपवधू यांना या मेळाव्यातून कोणताही फायदा होत नसल्याचे दिसून आल्यानंतर, मागील काही वर्षा पासून ऋणानुबंध अंतर्गत मर्यादित समाजबांधवांचे स्नेह-संमेलन आपण घेत आहोत. प्रत्येक वर्षी समाजातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. १५० उपवर, १५० उपवधूंची नोंदणी झाल्या नंतर नाईलाजास्तव नोंदणी बंद करून इच्छुक उपवर-उपवधूंची नाराजी पदरात घ्यावी लागत आहे.
हे स्नेह-संमेलन १५० उपवर आणि १५० उपवधू व त्यांचे त्यांचे प्रत्येकी २ किंवा ३ पालक असे एकूण १००० समाजबांधवांच्या उपस्थितीत भव्य दिव्य रित्या पार पडत असते. या स्नेहसंमेलनातुन उपवर उपवधू आणि त्यांच्या पालकांना एकाच हॉल मधे प्रत्येकाशी प्रत्यक्ष जो संवाद साधता आला व जास्तीत जास्त विवाह जुळण्यात आले..
या ही वर्षी १५० उपवर आणि १५० उपवधू व त्यांचे २ किंवा ३ नोंदणीकृत पालक यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. येणाऱ्या पालकांचे छायाचित्र नोंदणी फॉर्म सोबतच पाठवावयाचे आहे. तरी सर्व समाज बांधवांनी त्वरित नोंदणी करावी हि विनंती..
विशेष सुचना : पहिल्या १५० उपवर व १५० उपवधुंचीच नोंदणी करण्यात येइल. .
.
अध्यक्ष श्री. बाबुराव शक्करवार.
उपाध्यक्ष श्री. एकनाथ मामडे.
सचिव श्री. राहुल जिल्हेवार.
कोषाध्यक्ष श्री.श्रीराम मेडेवार.
संयोजक श्री. अनिल गंजेवार.
.
सदस्य :.
श्री. पवन चाडावार
श्री. नंदकुमार महाजन .
श्री. सतीश मुक्कावार .
श्री. अजित जिल्हेवार
श्री. बालाजी कवटीकवार .
श्री. सुनील मोरलवार .
श्री. सुरेश पळशीकर.
श्री. किरण जवादवार .
श्री. आदित्य कोत्तावार .
श्री. राहुल बासटवार.
श्री. सतीश बिडवई .
डॉ. पांडुरंग गंजेवार
श्री रवींद्र कोटलवार
श्री सदाशिव महाजन
डॉ. अजय बोजलवार.